कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना एसीबीची नोटीस आलेली आहे. राजन साळवी देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत, त्यामुळे जर राजन साळवी यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली तर शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याचपार्श्वभूमिवर वैभल नाईक म्हणाले की, जनसामान्यामध्ये ज्याप्रकारे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे... आज एका पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्यावर वेळेला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणे प्रवृत्त करणे, यामध्ये जनतेचं काही हित नाही... आज आपण बघितलं तर 96 हजार पेक्षा जास्त कोटींची ध्येय आज ठेकेदार आणि इतर लोकांकडे आहेत.
त्यामुळे आज सगळी विकासाची काम ठप्प आहेत. या संदर्भात तुम्ही काही तरी बोललं पाहिजे, निवडणूकीच्या वेळेस तुम्ही जी आश्वासन दिली ती आश्वासन कशी पुर्ण करणार याकडे बघितलं पाहिजे... आणि ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन गद्दारी असं नाव त्याला दिलं पाहिजे, असा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.