ताज्या बातम्या

ZP Result 2026 : जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे) दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज (सोमवार) जाहीर होत आहेत. निकालांच्या पहिल्या झलकात महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज (सोमवार) जाहीर होत आहेत. निकालांच्या पहिल्या झलकात महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून भाजप आणि शिवसेना (शिंदे) प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, महायुतीचा पक्ष महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने पूर्ण विश्वास दाखवला असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा निकाल त्यांच्या जवळ एक विशेष भेट आहे.

खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “महायुती म्हणून आमच्या पक्षाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नगरपालिका नगराध्यक्षांच्या निवडणुकांमध्येही आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य आणि जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हेच चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या जनतेने आज ही वाढदिवसाची भेट दिली आहे.”

ठाकरेंच्या शिवसेनेची तुलना…

शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानानंतर सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार महायुतीच्या उमेदवारांची आघाडी स्पष्ट दिसून येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप 172 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना (शिंदे) 102, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 95 जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला 39 जागांसह पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. चौथ्या स्थानी काँग्रेस आहे. नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत म्हटले, “महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही.”

महायुतीच्या नेतृत्वावर महाराष्ट्राचा शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात जे काम केले, त्यावर जनतेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालातून शिक्कामोर्तब केले आहे, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला. सध्या संपूर्ण निकाल अजून जाहीर झालेला नाही, पण या निकालांनुसार महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळणार असल्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी महायुती युती झाली आहे, काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार जिंकले आहेत; तरीही प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या पक्षांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका हे स्थानिक पातळीवर राजकीय प्रभाव दाखवतात. यंदाच्या निकालांनुसार, महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात महायुतीचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला आहे. शिवसेना (शिंदे) दुसऱ्या क्रमांकावर असून, ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा पराभव झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा