ताज्या बातम्या

ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांना शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांचं प्रत्युत्तर

बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांचे रण सुरू. ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांना राजेंद्र राऊत यांचं प्रत्युत्तर.

Published by : shweta walge

बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या करायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांना शिवसेना शिंदे गटाचे बार्शीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. बार्शीतील प्रचाराचे रणधुमाळी आता सुरू झाली आहे.

आम्ही प्रामाणिक राहिलो म्हणून आज तुमच्यासमोर उजळ माथ्याने भाषण करू शकतो. आमचं पक्ष चोरून नेले त्यामुळे ते चोरलेला पक्ष आहे. बार्शीत चोरलेला बाण घेऊन कोणाला आहे तुम्ही बघा. राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. माणसांवर खोटे गुन्हे दाखल करून माणसं जिंकता येत नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.

माजी मंत्री दिलीप सोपल यांचा लबाड लांडगा असा उल्लेख करत राजेंद्र राऊत यांनी टिका केली. जो खासदार माझा होऊ शकला नाही, जो मला थोरला भाऊ म्हणत होता तो तुमचा काय होणार, खासदार निंबाळकर यांना गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही, मलाही राजेंद्र राऊत म्हणतात, माझा नाद करू नये.. माझ्या सांगण्यावरून 2019 ला उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना तिकीट दिलं. तू तुझं तोंड बंद कर, तुझं लफडं माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही असं म्हणत राजा राऊत यांची टीका.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सभागृहस्थळी उद्धव ठाकरे दाखल

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं