ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांची मत समजून घेत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असं होत नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत (sanjay raut) यांनी यानिमित्तानं शिवसेनेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील भूमिकेसंदर्भातील संकेत दिले आहेत.

राष्ट्रपती पदासाठी शिवसेना एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौैपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेकडून आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या निर्णयाला खरंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरे यांनी बहुतांश खासदारांच्या मागणीला मान देणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वात आधी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हीच मागणी आणखी 11 खासदार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेतील खासदारांनी केल्यानं आधीच आमदारांच्या बंडामुळे पक्षाला पडलेली खिंडार भरुन काढताना खासदारांच्या मागणीचा विचार उद्धव ठाकरे करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच आता सुत्रांच्या हवाल्यानं आलेल्या माहितीवरुन, उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएनं राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसाठी निमंत्रण मिळालं आहे. दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं असता आम्ही या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो, असं संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर