ताज्या बातम्या

Eknath Shinde : शिवसेनेचा मुंबईत लवकरच भव्य मेळावा; विजयी प्रतिनिधींचा शिंदेंकडून सत्कार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लवकरच मुंबईत भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लवकरच मुंबईत भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच नगराध्यक्ष या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. या मेळाव्यात विजयी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार असून आगामी काळातील संघटनात्मक रणनीती ठरवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा

या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. निवडून आलेल्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या यशानंतर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

पक्षाच्या माहितीनुसार, आगामी पाच वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्यामुळे संघटन विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. गावागावात आणि शहरांमध्ये शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना देण्यात येणार आहेत.

शिवसेनेने “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पक्ष घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी युवक, महिला आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासन, विकासकामे, नागरिकांशी संपर्क आणि पक्षनिष्ठा टिकवण्याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक कारभार करावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. राज्यातील विविध भागांत शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारा मेळावा हा पक्षाच्या भविष्यातील राजकीय धोरणासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा