शिवसेना उबाठा पक्षाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू यांच्या सोबत दोन तास चर्चा झाली. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल. अशातच आता मीरा-भाईंदर मध्ये माजी आमदार गिल्बर्ट मिंडोसा यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला.
त्यांच्याबरोबर शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी,माजी नगरसेवक बर्नार्ड डिमेलो, माजी नगरसेवक गोविंद जर्जीस यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. माजी आमदार गिल्बर्ट मिंडोसा यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखीन बळकट झाली आहे असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
वसई - विरार मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात काल विविध पक्षाच्या ८०० पदाधिका-यांनी पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी वसईत फाटक यांच शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. बहुजन विकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. वसई विरार मध्ये गेल्या ३५ वर्षापासून बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती.
माञ या विधानसभा निवडणूकीत मतदार राजानी नालासोपारा, वसई आणि बोईसर विधानसभेत शिवसेना आणि भाजपाने आपले उमेदवार निवडून दिले आहेत. तसेच सध्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूकींचे वारे वाहू लागल्याने आगामी दिवसात आणखीन मोठे धक्के देणार असल्याचं शिवसेनचे जिल्हाप्रमुखे निलेश तेंडूलकर यांनी यावेळी सांगितले आहे.