थोडक्यात
एसटी दरवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एसटी दरवाढीविरोधात आंदोलन
आज पुणे, कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून एसटी तिकीट दरवाढी विरोधात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.
आज पुणे, कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असून पुण्यामध्ये 12 वाजता स्वारगेट बस डेपो येथे तर कोल्हापुरात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 11 वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.