महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. केवळ थापा मारण्याचं काम सरकारने केलं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडक्या कंत्राटदारांनी हा अर्थसंकल्प गिळला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याऐवजी 24 तास वीज द्यावी, अशी मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे मेट्रोवर खर्च केला जातोय, मग बेस्टवर का केला जात नाही? असा सवालदेखील ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 2024 मधील निवडणुकीमध्ये जे बोलले होते त्यातील एक तरी गोष्ट केली आहे का? हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.