Operation Tiger 
ताज्या बातम्या

Operation Tiger: शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, कुणाचं होणार पक्षात इन्कमिंग?

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Published by : Gayatri Pisekar

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेचे निवडणुकीत विधानसभेसारखेच यश मिळावं यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आहे.

शिवसेनेतून, काँग्रेसमधून मोठे चेहरे शिवसेनेत येणार - उदय सामंत

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास हा चांगलाच बळावला आहे. खरी शिवसेना म्हणून जनतेने आपल्याच मागे उभे राहून आपल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याचा ठाम विश्वास सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमधून शिवसेनेत येणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून, काँग्रेसमधून मोठे चेहरे आपल्या पक्षात येतील असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू झाला आहे.

रत्नागिरी येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उदय सामंत सुरुंग लावला. मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील रणरागिणी समजल्या जाणाऱ्या राजुल पटेल यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला. तर उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी बोरिवली, मागाठाणे आणि नालासोपारा येथून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पक्षात प्रवेश केला आहे. तर याच वेळी पनवेलच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतील. 25 फेब्रुवारीला यासंबंधी सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार असून या दिवशी निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातून निकाल येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून तयारी सुरू आहे. खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी बैठकांचं सत्र एकनाथ शिंदे यांनी सुरू केले. तर राज्यात इतर ठिकाणी जिथे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत. तिथली तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट वैयक्तिक कारणांमुळे असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेने पडद्यामागून 'ऑपरेशन टायगर' सुरू केल्याची माहिती आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून पुढील काही दिवसात हे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू

१) रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे माजी आमदार

२) महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर

३) रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर

४) सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट

५) गणपत कदम, रत्नागिरीचे माजी आमदार ठाकरे गट

६) चंद्रकांत मोकाटे, कोथरूड चे माजी आमदार ठाकरे गट

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला चांगलं यश मिळालं. जनतेने हाच विश्वास महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आपल्यावर ठेवणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांना आहे आणि म्हणूनच जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांच्याकडून "आभार यात्रा" देखील सुरू करण्यात आलेली आहे. याच यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्ष संघटनेची बांधणी एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद