ताज्या बातम्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून उद्या मालवण बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा तुटल्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्या मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा तुटल्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्या मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आणि भास्कर जाधव मालवण येथे जाणार आहे. शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात पडल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे.

मा. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. शासन प्रसासनाच्या या भ्रष्टकारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या मालवणात विराट जनसंताप मोर्चाचे आयोजन करीत आहोत. प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांच्या मनात उफाळलेला तीव्र संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि या दुर्घटने मागच्या सर्व सुत्रधारांना कायमची अद्दल घडविण्यासाठी उद्या बुधवार दि. 28 ॲागस्ट रोजी सकाळी 10 वाजता मालवण भरड दत्तमंदिर येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा धडकणार आहे. या विराट जनसंताप निषेध मोर्चात तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करीत आहेत.

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा तुटल्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्या मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कडक बंद पाळणार आहे. काँग्रेस पक्षाकडून बंटी सतेज पाटील यांनी मालवण येथे भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उद्या मालवण येथे भेट देणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा