shivsena balasaheb thackeray know the life and legacy of balasaheb thackeray maharashtra  
ताज्या बातम्या

Balasaheb Thackeray: भगवं फडकवणारा नेता, बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेरणादायी प्रवास

Bal Thackeray Jayanti 2026 : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आहे.

Published by : Riddhi Vanne

Bal Thackeray Jayanti 2026 : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारा हा नेता केवळ राजकारणी नव्हता, तर एक विचारधारा होता.

23 जानेवारी 1926 रोजी जन्मलेल्या बाळासाहेबांनी सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून केली. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करताना समाज आणि राजकारणावर त्यांनी आपल्या रेषांमधून प्रहार केला. पुढे ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसाच्या प्रश्नांना आवाज दिला आणि 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत मराठी माणूस दुर्लक्षित होऊ नये, यासाठी शिवसेना उभी राहिली.

काळानुसार बाळासाहेबांनी पक्षाची भूमिका बदलत नेली. हिंदुत्वाचा विचार, भाजपसोबत युती, सत्ता, विरोध, वाद—या सगळ्या टप्प्यांत त्यांची शैली ठाम आणि आक्रमक राहिली. ‘सामना’ वृत्तपत्रातून त्यांनी आपले विचार थेट मांडले. कौटुंबिक धक्के, राजकीय संघर्ष आणि आजारपण यांचा सामना करत अखेर 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांचे विचार, आवाज आणि प्रभाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा