थोडक्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस….
सुनील राऊतांना फोन करुन शिंदेंनी केली संजय राऊतांची विचारपूस….
राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्याशी बोलून त्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
( Shivsena Eknath Shinde Calls Sunil Raut Inquires About Sanjay Raut Health) : शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊतांच्या तब्येतीची फोनवरून चौकशी केली. राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्याशी बोलून त्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी राऊत रुग्णालयात दाखल झाले होते, मात्र सोमवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिंदेंनी त्यांना “लवकर बरे व्हा” असा आपुलकीचा संदेश दिला.
यापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभेतून राऊत यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत यांनी पुढील दोन महिने राजकीय आणि सामाजिक उपक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून, ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांच्या पोस्टनंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे यांनीही “काळजी घे संजय काका, तू नेहमी लढतोस आणि जिंकतोस” असे म्हणत शुभेच्छा दिल्या, ज्यावर राऊत यांनी “धन्यवाद my dear Aaditya” असे उत्तर दिले.
दरम्यान, रुग्णालयातून बाहेर पडल्यावर राऊत यांनी “पुन्हा लेखणी हातात घेतली पाहिजे” असे म्हणत फोटो शेअर केला होता. आणि आता, राजकीय मतभेद विसरून एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या फोन करून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतल्याने हा हृद्य संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.