विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंत्रीपदासाठी आमदारांची लॉबिंग सुरु असल्याची चर्चा होती. वर्षा आणि सागर बंगल्यावर शिंदेगटाच्या आमदारांची वर्दळ होती.
दरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आल्याच पाहायला मिळत आहे. आज संध्याकाळी चार वाजता शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. आता शपथविधीच्या दिवशी शिंदे गटाची टीम फायनल होत आली आहे. मंत्रिपदासाठी शिंदेगटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. संभाव्य मंत्र्यांची नावं, महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गटाची यादी समोर आली आहे.शिवसेनेत काही जणांना संधी मिळणार आहे.
या आमदारांना गेले शिंदेगटाकडून फोन
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगेश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट