ताज्या बातम्या

इन्स्टाग्रामवर बनवलेल्या रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात हे कृत्य केवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

एका बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून 'मिस यू किंग' नावाची एक रील बनवून ती पोस्ट करण्यात आली. या रीलमध्ये आमदार अर्जुन खोतकर आणि अभिमन्यू खोतकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. इतकेच नाही, तर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

सोशल मीडियावर असा बदनामीकारक आणि धमकीचा मजकूर प्रसारित झाल्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान धक्कादायक गोष्ट समोर आली – ही धमकी देणारी रील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने तयार केली होती. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी पालकांनाही योग्य ती समज दिली आहे.

या घटनेवर आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आठवडाभरापासून इन्स्टाग्रामवरून धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही आयपीएल सट्टा, मटका आणि जमिनीच्या व्यवहारांबाबत काही गोष्टी उघड केल्या होत्या. त्यामुळे हे कृत्य घडले असावे. पण अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आमचे काम आम्ही ठामपणे करत राहू.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा