थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Shiv Sena-NCP) शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 रोजी नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाच्या स्वामित्वावर वाद उभा राहिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं, तर अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष मान्य केला. यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबर रोजी या वादावर सुनावणी केली, आणि आता 21 जानेवारी रोजी पुढील युक्तिवादासाठी वेळ दिला आहे. या दिवशी शिवसेनेचे प्रकरण आणि नंतर राष्ट्रवादीचे प्रकरण ऐकले जाईल, ज्यासाठी प्रत्येक गटाला दोन तासांचा वेळ मिळणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आयोजन 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून, महापालिकांच्या निवडणुकांपर्यंत हे सर्व पार पडण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आता न्यायालयाचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
Summery
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 रोजी नवी तारीख निश्चित करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता