ताज्या बातम्या

अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला; सामनातून हल्लाबोल

सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली घसरण आणि शेअर बाजारातील पडझड यावर भाष्य करत शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टिका करण्यात आली आहे. “केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली घसरण आणि शेअर बाजारातील पडझड यावर भाष्य करत शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टिका करण्यात आली आहे. “केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला. उलट त्याआधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला. आपल्या देशाचा बोलबाला जगात फक्त मागील आठ वर्षांतच झाला, असे ढोल सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक सर्रास पिटतात; परंतु सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली ‘न भूतों’ घसरण आणि शेअर बाजारातील पडझड ही आपल्या ‘दमलेल्या सरकारची खरी कहाणी आहे. असे सामनातून म्हटले गेले आहे.

रुपयाचे अवमूल्यन होतेच आहे आणि रुपयाचे मूल्य टिकवून ठेवण्याची कसरत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला मौल्यवान परकीय चलन खर्च करावे लागत आहे. त्यातून परकीय चलनाचा साठा आणखी कमी होणार आणि त्यामुळे रुपयाच्या घसरगुंडीचा वेग वाढताच राहणार असे हे दुष्टचक्र मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. तरीही आपली अर्थव्यवस्था सध्या साडेसात टक्क्यांच्या वेगाने धावत असल्याचे अर्थमंत्र्यांना दिसत आहे. आता साक्षात अर्थमंत्र्यांना दिसते म्हटल्यावर जनतेला न दिसण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात सुमारे साडेसात टक्के दराने घोडदौड करील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी म्हणाल्या आणि सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया आजवरच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची तब्बल 19 पैशांची घसरण झाली. म्हणजे एका डॉलरसाठी आता 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत. रुपयाची ही पडझड भविष्यातही थांबण्याची चिन्हे नाहीत. तरीही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबद्दल एक गुलाबी चित्र रंगविले. आता अर्थमंत्री असल्याने अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, रुपया, महागाई याबाबत ‘सगळे कसे छान छान’ असेच त्यांना बोलावे लागणार हे उघड आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही आणि जनतेला बसणारा महागाईचा मारदेखील चुकत नाही. अर्थमंत्री ज्या रविवारी सांगतात की, आर्थिक विकासाचा दर या वर्षीच नाही, तर पुढील आर्थिक वर्षातही साडेसात टक्क्यांच्या आसपासच राहील तोच रविवार शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक संडे’ ठरतो या विरोधाभासाला काय म्हणायचे?

यासोबतच केंद्रावर हल्लाबोल करत म्हटले आहे की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला. उलट त्याआधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला. आपल्या देशाचा बोलबाला जगात फक्त मागील आठ वर्षांतच झाला, असे ढोल सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक सर्रास पिटतात; परंतु सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली ‘न भूतों’ घसरण आणि शेअर बाजारातील पडझड ही आपल्या ‘दमलेल्या सरकारची खरी कहाणी आहे. नवीन कहाणी लिहिण्यासाठी जनताजनार्दनालाच आता शंखध्वनी करावा लागणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा