ताज्या बातम्या

2024नंतर सावंतवाडीचा डोमकावळा तुरुंगात असेल; ‘त्या’ नेत्याचं नाव काय? सामनातून हल्लाबोल

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेचा अग्रलेख सामनातून शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, महाराष्ट्रातले सध्याचे सरकार भ्रष्ट आणि अनैतिक आहे. पैशांचा वापर करून हे सरकार सत्तेवर आल्याचा घणाघात भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. डॉ. स्वामी यांनी हा घणाघात पंढरपुरात विठू माऊलीच्या साक्षीने केला. यावर ‘खोके’ आमदारांचे रक्त का उसळू नये? असा सवाल विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या अशा ठग आणि पेंढाऱ्यांचीच चलती असावी आणि राज्य त्यांच्याच हुकमाने चालतेय असे वातावरण आहे. महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरात कधीकाळी ‘अंडरवर्ल्ड’ म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व होते. त्यांची जागा आता या राजकीय ठग आणि पेंढाऱ्यांनी घेतली आहे.

दीपक केसरकरांच्या फुटीर गटात किमान 10-12 आमदार असे आहेत की, ते ईडी, सीबीआयच्या भयाने पळून गेले आहेत. तुरुंगात जावे लागेल या भीतीने त्यांनी पक्षांतरे केली. काय सांगावे, उद्या म्हणजे 2024 नंतर हे सगळे पुन्हा तुरुंगात नसतील कशावरून? त्यांच्या जोडीला हा सावंतवाडीचा डोमकावळाही असेल, अशी भविष्यवाणी आम्ही आजच नागपुरातून करीत आहोत, बेइमान आमदारास ‘खोकेवाले’ म्हणून डिवचताच तो आमदार निदान त्यावर प्रतिवाद तरी करीत असे. ”आम्ही नाही त्यातले…” असा खोटा आव आणून तोंड तरी लपवत होते, पण आता आमदार जाहीरपणे म्हणू लागले आहेत की, ”होय, होय! आम्ही खोके घेतले. तुमच्या पोटात का दुखतेय?” अशा प्रकारे आमदारांनी लाज सोडल्यावर सरकारला निर्लज्ज सरकार नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणायचे?असे सामनातून म्हटले आहे.

यासोबतच सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर, असं सांगतानाच या डोमकावळ्याने संजय राऊतांच्या तुरुंगवासावर अज्ञानी भाष्य केले. त्यांनी राऊत यांची सुटका करताना न्यायालयाने दिलेले खरमरीत निकालपत्र एकदा भिंग लावून वाचायला हवे, व सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणून ख्यातकीर्त असलेले मंत्री केसरकर यांनी संजय राऊतांचा तुरुंगवास काढला. छान, त्यांना कायद्याचे ज्ञान अजिबात दिसत नाही. खोके सरकारात स्वयंभू चाणक्यांची भरमार झाली आहे. जो तो दुसऱ्यांना नैतिकता आणि शहाणपण शिकवीत आहे. अशी जोरदार टीका सामनातून केसरकरांवर करण्यात आली आहे.

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे