शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड ही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आज महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम केलं तर सर्व गुन्हेगारी संपून जाईल असेही गायकवाड म्हणाले आहेत.
सरकारने एखादा कायदा वाढवला तर पोलिसांचा एक हप्ता वाढतो. दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, तसेच पोलिसांनी छापा टाकून 50 लाख पडले तर ते 50 हजारच दाखवतात, असेही गायकवाड म्हणाले.