Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

'या' संकटाने पाकिस्तानला खोल खाईतच ढकलले; सामनातून सांगितली पाकिस्तानमधील परिस्थिती

Published by : Siddhi Naringrekar

पाकिस्तानवर ओढावलेल्या आर्थिक संकटावर शिवसेनेचा अग्रेलख सामनातून भाष्य करण्यात आले आहे. 2014 पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांतील हा सर्वात नीचांकी परकीय चलनसाठा आहे. निर्यातीपेक्षा आयात करण्यावर पाकिस्तानचा अधिक भर आहे आणि बाहेरच्या देशांतून होणाऱ्या आयातीसाठी तर परकीय चलनच मोजावे लागते. परिस्थिती इतकी भयावह आहे की, कशीबशी महिनाभर आयात करता येईल एवढीच परकीय पुंजी पाकिस्तानकडे उरली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. असे सामनातून म्हटले आहे.

हिंदुस्थानचा दुसरा शेजारी असलेला पाकिस्तानही महागाई, टंचाई आणि कंगाली अशा तिहेरी आर्थिक संकटास सामोरा जात आहे. दिवसेंदिवस खोल गर्तेत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानची वाटचालही श्रीलंकेतील यादवीच्या दिशेनेच सुरू असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. तसेच पाकिस्तान भयावह आर्थिक संकटातून जात आहे. हे आरिष्ट थोपवण्याची क्षमताही पाकिस्तान गमावून बसला आहे. त्यामुळे महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे जर्जर झालेली पाकिस्तानी जनता उद्या श्रीलंकेप्रमाणेच सत्ताधाऱ्यांच्या घरादारांत घुसली तर आश्चर्य वाटायला नको. असे सामनातून सांगण्यात आले आहे.

गरिबी आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दहशतवाद व शस्त्रखरेदीवर पैसा उधळल्यामुळेच पाकिस्तानवर ही वेळ ओढवली. शत्रूवरही येऊ नये म्हणतात ती वेळ हीच. गेली काही वर्षे पाकिस्तान सातत्यानेच आर्थिक संकटाचा सामना करतो आहे आणि आता तर या संकटाने पाकिस्तानला खोल खाईतच ढकलले आहे. एखादी कर्जबाजारी व्यक्ती घर चालवण्यासाठी जशी घरातील किडुकमिडुक वस्तू विकायला लागते, तशीच अवस्था आज पाकिस्तानवर ओढवली आहे. असे म्हणत पाकिस्तानच्या परिस्थीतीवर भाष्य करण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना