Eknath Shinde 
ताज्या बातम्या

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसणार?

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याची माहिची सुत्रांनी दिली आहे.

Published by : Team Lokshahi

यंदाचं वर्षे निवडणुकांचं वर्ष होतं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विधानसभेमध्ये महायुतीने मेजर कमबॅक केलं. महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. निकालानंतर अखेर आज १२ दिवसांनंतर महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. राज्याला पुन्हा एकदा ट्रिपल इंजिन सरकार मिळालं आहे. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथविधी पार पडताच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचालींना वेग आला आहे. शपथविधी आधी एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता कोणतं खातं कोणाला मिळणार याविषयी सस्पेन्स कायम आहे. महायुतीतील घटकपक्षांमध्ये भाजपचं मोठा भाऊ असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणतं खातं येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याची माहिची सुत्रांनी दिली आहे. पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान असणार आहे. पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय याचा विचार केला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचार केला जाणार आहे. ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी खेळीमेळीने राज्यकारभार चालवू असं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना खूश ठेवण्याचे फडणवीसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. विशेषत: गृहखातं कायम ठेवण्याची शिंदे यांची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे यांना खुश ठेवणे फडणवीस यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा -

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा