ताज्या बातम्या

'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; शिंदे-ठाकरेंचं मनोमिलन होणार?

शिवसेनेच्या दोन्ही गटातले नेते शिंदे आणि ठाकरेंना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

Published by : Sudhir Kakde

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी झाल्यावर विराम लागेल अशी शक्यता होती. मात्र आता पुन्हा एकदा एका नव्या 'शक्यते'नं नव्या विषयाला तोंड फोडलं आहे. महाविकास आघाडीचं गणित न पटल्याचं सांगत शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बाहेर पडले. यामुळे फक्त शिवसेनेची सत्ताच गेली नाही, तर शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) भवितव्य, पक्षाचं, संघटनेचं अस्तित्व सुद्धा अत्यंत धोक्यात आलेलं असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे. यावरुन येणाऱ्या काळात सेना-भाजव एकत्र येऊ शकतात. अर्थात शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊन भाजपसोबत जातील आणि अशी शक्यता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. मात्र त्यांना आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपनेत्यांना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे भाजपचे सोमय्या, राणे सुद्धा सेना नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे भाजप आणि सेनेतला संघर्ष संपता संपेना झालाय. ही सर्व गणितं जरी गुंतगुंतीची असली तरी येणाऱ्या काळात शिंदे गट, ठाकरे गट एकत्र येतील अन् पुन्हा शिवसेना भाजपसोबत जाईल अशी शक्यता जास्त आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही या चर्चेला दुजोरा दिला असून, युतीचा सर्वात मोठा अडथळा आज मानपान असल्याचं समजतंय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघा़डी तोडा आम्ही महाराष्ट्रात येतो असं आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं असं केसरकर म्हणतात. तर शिवसेनेचे अनेक आमदार आज पक्षानं एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा