Amway company Team Lokshahi
ताज्या बातम्या

Amway ला झटका, ईडीकडून मोठी कारवाई

ईडीने अ‍ॅमवे इंडिया या मल्टी लेव्हल मार्केटिंग एमएलएम कंपनीला मोठा धक्का

Published by : Siddhi Naringrekar

ईडीने अ‍ॅमवे इंडिया या मल्टी लेव्हल मार्केटिंग ( multi-level marketing, एमएलएम ) कंपनीला मोठा धक्का दिला आहे. या कंपनीच्या 757 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. याची माहिती ईडीनं जारी केली आहे.

अ‍ॅमवे कंपनीची एकूण मुंबईतील बँक व्यवहारासह 757 कोटी 77 लाख रुपयांची कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून 36 बँक खात्यांतील 345.94 कोटी रुपये जप्त केले आहेत.

या कंपनीकडून ग्राहकाला उत्पादनांची थेट विक्री केल्यास मिळणाऱ्या चांगल्या कमिशनवर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवलं जात होते. या कमिशनमुळे बाजारातील स्पर्धक उत्पादनांपेक्षा कंपनीच्या किंमती जास्त आहेत. यावर केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण (थेट विक्री) 2021 नियमांतर्गत अशा विक्रीवर बंदी घातली आहे.

या कंपनीची तमिळनाडूतील प्लांट , मशिनरी , वाहने , बँक खाती आणि मुदत ठेवी, जमीन आणि कारखान्याची इमारत यांचा समावेश असल्याची माहिती तपास संस्थेने दिली आहे.

या कंपनीने 2002-03 ते 2021-22 यावर्षी व्यवसायातून 27 हजार 562 कोटी रुपये कमवले तर 7,588 कोटी रुपये कमिशनपोटी अमेरिकेतील एजंटांना दिले. असे ईडीने सांगितले असून या प्रकरणात आता तपास सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी