ताज्या बातम्या

धक्कादायक! सिगारेट आणून दिली नाही म्हणून मित्रानेच केली मित्राची हत्या

सिगारेट आणून दिली नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राची भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे.

Published by : shweta walge

सिगारेट आणून दिली नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राची भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. जयेश जाधव असं मयत इसमाचे नाव असून जयेशच्या हत्येप्रकरणी त्याचा मित्र हरीश्चंद्र उर्फ बकूळ चौधरी याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपी बकूळला न्यायालयाने 15 तारखेर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या मारहाणीचा सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीतील पेंडसेनगर राहणारा जयेश जाधव आणि डोंबिवली पूर्व भागातील ठाकूर्ली परिसरात राहणार बकूळ चौधरी हे दोघे मित्र आहे. 4 नोव्हेंबरच्या दुपारी दोघे दारु पिण्यासाठी बसले होते. ते त्याठिकाणीहून घरी येण्यासाठी निघाले असता डोंबिवली पूर्व भागातील पेंडसे नगरातील एका इमारतीच्या गेटवर आले असता बकूळ याने जयेशला सिगारेट घेऊन ये असे सांगितले. त्यासाठी त्याने पैसे दिले होते. जयेशने सिगारेट आणली नाही. त्यामुळे बकुळ संतापला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात बकूळ याने जयेशला ठोषा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर आपटले. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मुंबईतील शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे उपचारा दरम्यान जयेशचा मृत्यू झाला.

अखेर डोंबिवली रामनगर पोलिसानी बकूळच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 नाव्हेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा