government exam|shocking news team lokshahi
ताज्या बातम्या

पत्नीला सरकारी नोकरी लागली म्हणून पतीनेच कापला हात

पत्नीला सरकारी नोकरी मिळताच पतीने कापला तिचा हात, धक्कादायक कारण आलं समोर

Published by : Shubham Tate

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्याच्या बातमीने तो इतका संतप्त झाला की पतीने मोठा वाद सुरू केला केला. आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. घटनेनंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्रामचे आहे. पतीला पत्नीची प्रगती सहन होत नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, रेणू खातून नावाच्या महिलेला सरकारी रुग्णालयात नर्सची नोकरी लागली. मात्र पती मोहम्मद शेख पत्नीच्या नोकरीवर नाराज होता. (shocking husband chops off sleeping wifes right wrist to stop her from)

नोकरी मिळाल्यास पत्नी आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती त्याला वाटत होती. तो त्याला सोडून दुसरे लग्न करेल. यामध्येही मित्रांनी आगीत तेल ओतण्याचे काम केल्याने चिथावणीखोर मोहम्मद शेख हा अधिक पेटून उठला. पीडितेने तिची कहाणी सांगितली की, रात्री 10 वाजता झोपल्यानंतर मी झोपी गेली आणि अचानक रात्री दोनदा माझे डोळे उघडले. माझे पती वारंवार वॉशरूममध्ये जात असल्याचे मला दिसले. मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की माझ्या पोटात दुखत आहे. काही वेळाने उशी तोंडावर ठेवून हातावर कात्री मारली. यावेळी त्याच्यासोबत आणखी तीन लोक होते. सर्व कागदपत्रे घेऊन ते पळून गेले. त्यानंतर मला रुग्णालयात हलवण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."