ताज्या बातम्या

Ambernath: अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना! आईनेच नवजात बाळाला इमारतीतून फेकलं

अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना! आईनेच नवजात बाळाला इमारतीवरून फेकल्यामुळे बाळाचा दुर्दैवी मृत्यू. पोलिसांनी बाळाची आई आणि आज्जीला ताब्यात घेतलं.

Published by : Team Lokshahi

एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. आईनेच नवजात बाळाला इमारतीवरून फेकले. यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलं आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज २ मधील डी विंग मध्ये ही घटना घडली. या इमारतीत एक ही महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती.

रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूममधून इमारतीच्या डक्टमध्ये तिला फेकून दिलं. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केलं. अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. तर या बाळाची आई आणि आज्जी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानंच त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होतेय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं