औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव हे आता छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक असं झालं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पाटीतील उर्दू नाव काढून टाकण्यासाठी वाद पेटला होता. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र प्रकार समोर आला आहे.
एका विकृत मानसिकता असणाऱ्या तरुणाने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीजवळ लघुशंका केली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक येथील नवे नाव असलेल्या पाटीजवळ लघुशंका केली आहे.
काही जणांनी लघुशंका करणाऱ्यास रोखले तर काहींनी लघुशंका करायला लावली असल्याचा प्रकार यावेळी घडला आहे. छत्रपती संभाजीनगर लघुशंका करणारा कोण आहे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.