Satish Wagh 
ताज्या बातम्या

सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Published by : Team Lokshahi

पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या हत्याप्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. सतीश वाघ यांची हत्या करणारा शेजारची व्यक्ती असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. पोलीस तपासात या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.

थोडक्यात

  • सतीश वाघ यांच्या पत्नीनेच दिली होती सुपारी

  • पत्नीला गुन्हे शाखेने केली अटक

  • प्रेम प्रकरणातून खून केल्याचं समोर

काय आहे प्रकरण?

सतीश वाघ करून निर्घृन खून करण्यात आला. सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं.

या प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. यासाठी पोलिसांनी पुणे-सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या तपासातून चार आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरुने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. आरोपी भाडेकरुने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना 5 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, धाराशिवमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर आता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच प्रेम प्रकरणातून आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा