पनवेलमधील पळस्पे फाटा जवळील मॅरेथॉन नेक्सझोन टॉवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मैथिली दुवा 37 वर्षीय महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिने आपल्या आठ वर्षीय मुलगी मायरा हिला 29 व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बेडरुमच्या खिडकीतून बाहेर ढकलून दिले. त्यानंतर महिलेने स्वत: हा उडी मारुन जीव दिला आहे. आई आणि मुलगी तळमजल्यावरील मोकळ्या जागी पडल्या. दोघींना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.