Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक! आत्महत्येचा व्हिडीओ व्हायरल करीत तरुणाचा गळफास

जळगाव येथे वडिलांसोबत फर्निचरचे काम करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय धीरज शिवाजी काळे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Published by : shweta walge

मंगेश जोशी|जळगाव : जळगाव (Jalgaon) येथे वडिलांसोबत फर्निचरचे काम करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय धीरज शिवाजी काळे (Dheeraj Shivaji Kale) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ‘हॅलो गायीज् आज में आत्महत्या करणे वाला हु, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ असा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करत आत्महत्या केली आहे.

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर मध्ये राहणारा धीरज शिवाजी काळे हा 22 वर्षीय तरुण गुरुवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत स्टेट बँक कॉलनी भागात फर्निचरचे काम करण्यासाठी गेला होता. ज्या घरात फर्निचरचे काम सुरू होते त्या ठिकाणी काही वेळ काम केल्यानंतर धीरज घरात दुसरी कडे गेला, दरम्यान डबा खाण्यासाठी वडिलांनी धीरज ला आवाज दिला मात्र धीरज कुठेही दिसून आल्याने वडिलांनी व काम करणाऱ्या इतरांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता वरच्या मजल्यावर एका खोलीत धीरजने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

नागरीकांनी धिरजचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. दरम्यान, धिरजने आत्महत्येपूर्वी नऊ सेकंदांचा एक व्हिडीओ काही मित्र, समाजमाध्यमात व्हायरल केला होता. त्यात त्याने मी आत्महत्या करीत आहे. माझा व्हिडीओ लाईक करा, कमेंट करा अशी विनंती केली आहे. धिरज समाज माध्यमांवर अॅक्टीव होता. त्याने आत्महत्येचा निर्णय देखील समाजमाध्यमावर जाहीर केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा