ताज्या बातम्या

फ्रिज 24 तास सुरु ठेवावा? की काही वेळासाठी बंद करावा? जाणून घ्या

फ्रिज आज प्रत्येक घरातील अत्यावश्यक उपकरण बनले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

फ्रिज आज प्रत्येक घरातील अत्यावश्यक उपकरण बनले आहे. यात अन्नपदार्थ, दूध, फळं आणि भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतात. मात्र अनेकांच्या मनात एक शंका असते, ती म्हणजे फ्रिजला सतत चालू ठेवणं योग्य आहे का? की दररोज काही वेळासाठी बंद केल्याने वीजेची बचत होते?

फ्रिज ही एक अशी प्रणाली आहे जी आतून सतत थंड राहते. फ्रिज डिझाइन करताना त्याला दिवसाचे 24 तास सतत चालू राहील अशा पद्धतीने तयार केलं जातं. त्यामुळे तो सतत चालू ठेवल्याने कोणताही धोका नसतो. काही लोकांना वाटतं की फ्रिज थोडा वेळ बंद केला तर वीजेची बचत होईल. पण खरं तर हे चुकीचं आहे. फ्रिज सतत थंडावा टिकवण्यासाठीच कार्यरत असतो. तुम्ही वारंवार तो बंद-चालू केल्यास त्याच्या कूलिंग क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे त्यातील अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.

आजकाल बहुतेक फ्रिजमध्ये ऊर्जा बचतीसाठी स्मार्ट फीचर्स दिलेले असतात, जसे की ऑटो-कट सिस्टिम. ही प्रणाली ठराविक तापमान गाठल्यावर कंप्रेसर थांबवते आणि त्यामुळे वीजेचा अपव्यय टाळला जातो. गरज भासली तर कंप्रेसर पुन्हा सुरू होतो. त्यामुळे वापरकर्त्याला फ्रिज वारंवार बंद करण्याची गरज भासत नाही. जर तुम्ही घरात नसाल आणि दीर्घकाळासाठी प्रवासात असाल, तर फ्रिजमधील सर्व अन्नपदार्थ बाहेर काढून तो बंद ठेवावा. पण फक्त काही तासांसाठी किंवा एका-दोन दिवसांसाठी बाहेर जात असाल, तर फ्रिज चालू ठेवणंच योग्य ठरतं. फ्रिज 24 तास चालू ठेवणं पूर्णपणे सुरक्षित आणि योग्य आहे. ते सतत चालू ठेवण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. उलट, वारंवार बंद-चालू केल्याने नुकसान होऊ शकतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा