Shradha | Aftab Team Lokshahi
ताज्या बातम्या

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती, श्रद्धा करणार होती आफताबसोबत ब्रेकअप

पोलिसांना मेहरौली आणि गुरुग्राम सीमेवरील जंगलातून 13 मानवी हाडे सापडली असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत.

Published by : Sagar Pradhan

श्रद्धा वालकर हत्याकांड सध्या देशात प्रचंड चर्चेत आहे. अतिशय निर्घृणपणे झालेल्या या हत्येवर देशातभरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या प्रकरणात दिवसांदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहे. मात्र, आता तपासातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आफताबसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी श्रद्धा वालकर त्याच्यासोबत ब्रेकअप करणारी होती. मात्र, तिच्या या निर्णयाने संतापलेल्या आफताबने तिची हत्या केली असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या आफताब आणि श्रद्धामध्ये लहान गोष्टींवरून वाद होत असे. आफताबचे वागणं आणि त्याच्याकडून होणारी मारहाण याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय आफताबला पटला नाही. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता.

दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना मेहरौली आणि गुरुग्राम सीमेवरील जंगलातून 13 मानवी हाडे सापडली असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी त्याची तपासणी सुरू आहे.

आफताबच्या फ्लॅटमधील किचनमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्याशिवाय, 5 ते 6 इंच आकाराचे चाकूदेखील मिळाले आहेत. मात्र, हत्येसाठी वापरण्यात आलेले करवत पोलिसांना हस्तगत करता आले नाही. आफताबच्या फ्लॅटमधून काही कपडे जप्त केले आहेत. त्याशिवाय, पोलिसांनी पेटीएम, बम्बल डेटिंग अॅप, झोमॅटो आणि ब्लिंकिट सारख्या प्लॅटफॉर्मकडून माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा