ताज्या बातम्या

Shrikant Shinde : कुवतीप्रमाणे वक्तव्य करा श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका

खासदार श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

Published by : shweta walge

कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात मधील पाच जणांचा बळी केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती, या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले की, ज्याची जी कुवत आहे, त्याप्रमाणे त्याने वक्तव्य केलं पाहिजे, आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसतील तर करू नका, असं सडेतोड उत्तर त्यांनी दिलं आहे.

डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज पदाधिकारी मेळावा संपन्न झाला, या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना भाजपा पदाधिकारी देखील उपस्थित होते, या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते, यावेळी श्रीकांत शिंदे, यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

या मेळाव्यात ते म्हणाले की, हॉल ओसंडून वाहत आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे, सगळे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेत, कल्याण लोकसभेत शिवसेना भाजप आणि आरपीआय अशी युती होती आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने राष्ट्रवादीची ताकद देखील आम्हाला मिळाली, तिघांच्या ताकदीमुळे मताधिक्याच्या नवीन रेकॉर्ड कल्याण लोकसभा मतदारसंघात होणार आहे, बुथरचनेवर प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर 70 ते 80 हजार कार्यकर्ते तिन्ही पक्ष मिळून मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक बूथपर्यंत प्रत्येक वोटर पर्यत पोहोचता येईल असे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद