मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वरवर पाहता तो साधा जेवणाचा व्हिडीओ वाटतो, टेबल, ताट आणि शांतपणे बसून जेवण करणारी श्रुती. पण नीट पाहिल्यावर लक्षात येतं की यातली खरी मजा काही वेगळीच आहे.
या व्हिडीओमध्ये श्रुतीने हातात ग्लोव्ह्ज घातलेले आहेत आणि ते घालूनच ती जेवत आहे. तिचे पती, अभिनेता गौरव घाटणेकर, यांनी हा क्षण टिपून मजेशीर कमेंटसह तो शेअर केला. त्यांनी सांगितलं की, श्रुती नुकतीच नेल जॉब करून आली असल्याने भाजीतील हळदीचा रंग नखांना लागू नये म्हणून तिने ग्लोव्ह्ज घालण्याचा हा अनोखा उपाय केला.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या आहेत, काय आहेत जाणून घ्या...
“आमटीसाठी स्ट्रॉ घ्या”, “रबरी भेंडी जबरी भेंडी”, “कलियुगात अजून काय पाहायचं बाकी?” अशा भन्नाट कमेंट्सची रेलचेल झाली. स्वतः श्रुतीनेही खेळकरपणे “श्रुती ताई कोण?” आणि “नेल जॉब म्हणजे नेमकं काय?” असे प्रश्न पतीलाच विचारत मजा केली.
काहींनी “नवऱ्यालाच भरवायला सांग ना”, तर काहींनी “ताईंचा नाद करायचा नाही” अशा गंमतीदार टिपण्या करून हसवणूक केली. एकंदर हा छोटासा व्हिडीओ चाहत्यांना अक्षरशः खळखळून हसवणारा ठरला असून श्रुती–गौरव या जोडीची मस्त केमिस्ट्री पुन्हा एकदा समोर आली आहे.