Amol Mitkari Google
ताज्या बातम्या

Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या ट्वीटनं राजकीय वर्तुळात खळबळ! म्हणाले, "श्याम मानव सर लवकरच तुतारी गटात..."

फडणवीस-मानव यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. मिटकरी यांनी श्याम मानव यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठा दावा केला आहे.

Published by : Naresh Shende

Amol Mitkari Tweet On Shyam Manav: ईडी आणि इतर यंत्रणांनी अनिल देशमुखांवर दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप अनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्याम मानव यांना प्रत्युत्तर दिलं होतं. इको सिस्टममध्ये अलीकडच्या काळाता सुपारीबाज लोक घुसले आहेत. सुपारी घेऊन बोलणारी लोकं घुसली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? असा प्रश्न फडणवीसांनी केला होता. फडणवीस-मानव यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. मिटकरी यांनी श्याम मानव यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठा दावा केला आहे.

अमोल मिटकरी ट्वीटरवर काय म्हणाले?

"महाराष्ट्रातील बुद्धिजीवी म्हणून ओळखले जाणारे अनिसचे प्रमुख प्राध्यापक शाम मानव सर लवकरच तुतारी गटात अधिकृत प्रवेश घेऊन विधानसभेत उमेदवारी घेतलेले दिसतील." असं ट्वीट करत मिटकरी यांनी श्याम मानव यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठा दावा केला आहे. श्याम मानव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात लवकरच अधिकृतपणे प्रवेश करतील, असं मिटकरी म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

शाम मानव देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली, तर त्याचे पुरावे पहावे. त्यावर किती विश्वास ठेवावा, हे मला माहित आहे. मी खोटं बोलत नाही, खोटी मांडणी करत नाही. हे मी पाहिल्यादा बोललो नाही. हे मी ३४ सभांमध्ये मागील काही दिवसांपासून बोलत आहे. मला कुणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोललो, असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मला विकत घेण्याची क्षमता आहे की नाही, मला कुणी विकत घेऊ शकतं का? हे फडणवीसांना चांगलं माहित आहे.

आणीबाणीत इंदिरा गांधींचा विरोध केला होता. त्यावेळी संघाचे लोक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सोबतही काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी विचार करून बोललो. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे.लोकसभेत जनजागृती केली, विधानसभेत जनजागृती करेन. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी तीन वर्षे तासंतास वाट पाहली आहे. ते सहज भेटतात का? असा सवालही शाम मानव यांनी उपस्थित केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात