Admin
ताज्या बातम्या

सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी

मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला असून कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती.

सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. . शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटपावर चर्चा केली.

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजता सरकारचा शपथविधी होणार असून त्याची तयारी सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर