ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये चार तास चाललेल्या चकमकीत सिद्धू मुसेवाला हत्येतील दोन संशयीत ठार

क्रॉस फायरिंगमध्ये एका चॅनलच्या कॅमेरा पर्सनलाही उजव्या पायाला गोळी लागली आहे.

Published by : Sudhir Kakde

अमृतसर : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आणि पंजाब पोलिसांची मंगळवारी मोठी चकमक झाली. अमृतसरजवळील एका गावात चार तास चाललेल्या चकमकीत जगरूप रूपा आणि मनप्रीत उर्फ ​​मन्नू हे दोन गुंड ठार झाले आहेत. या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले असून, दोन शूटर्सला पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, जगरूप रूपा हा चकमकीत मारला गेला, तर दुसरा संशयित मनप्रीत सिंग सुमारे एक तास पोलिसांवर गोळीबार करत राहिला. सुमारे चार तासांच्या या चकमकीनंतर तो देखील ठार झाला. अमृतसरच्या भकना कलानौर गावात ही चकमक झाली. क्रॉस फायरिंगमध्ये एका चॅनलच्या कॅमेरा पर्सनलाही उजव्या पायाला गोळी लागली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव हे देखील अमृतसरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या भकना गावात चकमकीच्या ठिकाणी पोहोचले होते. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुख असलेले एडीजीपी प्रमोद बेन यांनी सांगितलं की, AK- 47 आणि विदेशी पिस्तुलाव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात काडतुसं आणि मॅगझिन गुंडांकडून जप्त करण्यात आले आहेत. असंही सांगितलं जातंय की, मनप्रीत हा शूटर असून, सर्वात आधी त्याच्याकडून मुसेवाला यांच्यावर AK47 मधून पहिली गोळी झाडण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात असलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाने मनप्रीतला मूसेवालावर पहिली गोळी झाडेल, असा आदेश दिला होता. खरं तर मनप्रीतला पंजाबमधील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, तेव्हा पटियाला गँगच्या सदस्यांनी त्याला तुरुंगातच बूट आणि चप्पलने मारहाण केली होती. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल केला होता. यामुळे पटियाला टोळीला धडा शिकवण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी मनप्रीतने गोल्डी ब्रारला पहिली गोळी चालवण्यास सांगितलं होती. या दोघांशिवाय तिसरा दीपक मुंडी हा देखील फरार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज