Sindoor Bridge Inauguration : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून ‘सिंदूर ब्रिज’ वाहतुकीसाठी खुला Sindoor Bridge Inauguration : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून ‘सिंदूर ब्रिज’ वाहतुकीसाठी खुला
ताज्या बातम्या

Sindoor Bridge Inauguration : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून ‘सिंदूर ब्रिज’ वाहतुकीसाठी खुला

मुंबई सिंदूर ब्रिज: रहदारीतून दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

Published by : Team Lokshahi

CM Devendra Fadnavis On Sindoor Bridge Inauguration : मुंबईतील रहदारीने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दक्षिण मुंबईत पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नव्या पुलाचे नाव ‘सिंदूर ब्रिज SindoorBridge’ ठेवण्यात आले असून, या ब्रिजचे पूर्वीचे नाव कार्नॅक ब्रिज होते. आज दुपारी 3 वाजल्यापासून हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे गौरवउदगार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कार्नॅक ब्रिजच्या जागी बांधलेला हा पूल मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेस नवा श्वास देणारा आहे. ब्रिटिश काळातील कार्नॅक concrete pole हे नाव एका अत्याचारी गव्हर्नरचे होते. 'ऑपरेशन सिंदूर'मुळे देशभक्तीचा अभिमान जागवणारे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीएमसीने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले, याबद्दल त्यांचे कौतुक करतो.”

जुना पूल सुरक्षा कारणास्तव पाडला गेला

ऑगस्ट 2022 मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरलेल्या 150 वर्ष जुन्या कार्नॅक ब्रिजला पाडण्यात आले होते. त्यानंतर त्याच जागेवर नवीन पूल उभारण्यात आला. हा पूल मस्जिद बंदर स्थानकाजवळ असून, तो पी.डी. मेलो रोडला क्रॉफर्ड मार्केट, कालबादेवी आणि मोहम्मद अली रोडसारख्या प्रमुख व्यावसायिक परिसरांशी जोडतो.

पुलाच्या बांधकामाची वैशिष्ट्ये

अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे काम वेगाने पार पडले. पूल 328 मीटर लांबीचा असून, यात 70 मीटरचा रेल्वे भाग आणि 230 मीटरचा प्रवेश मार्ग आहे. याच्या बांधकामासाठी 2 मोठ्या स्टील गर्डर्स वापरण्यात आले आहेत, प्रत्येक गर्डर 550 मेट्रिक टन वजनाचा आहे.

दक्षिणेकडील गर्डर ऑक्टोबर 19, 2024 रोजी बसवण्यात आला.

उत्तरेकडील गर्डर 26 व 30 जानेवारी 2025 रोजी नियोजित रेल्वे ब्लॉक्स दरम्यान बसवण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती. आता हा पूल मुंबईतील नागरिकांसाठी अधिक सुकर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणार आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shahapur : शहापूरमधील R.S दमानिया स्कूल प्रकरण; फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल