ताज्या बातम्या

Sindoor Bridge Inauguration : मुंबईकरांच्या वाहतूक समस्येवर मोठा दिलासा ; आजपासून ‘सिंदूर ब्रिज’ वाहतुकीसाठी खुला

Sindoor Bridge Inauguration: मुंबईकरांच्या वाहतूक समस्येवर मोठा दिलासा, आजपासून वाहतुकीसाठी खुला.

Published by : Riddhi Vanne

मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईमधील मस्जिद बंदर येथे कर्नाक पुलाचे नामांतर करुन आता त्याचे नाव 'सिंदूर पूल' असे ठेवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा उपस्थित राहिले होते.

आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले आहे.

गेल्या 10 वर्षांपासून चालत असलेल्या पूर्व आणि पश्चिम मुंबईमधील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

150 वर्ष जुना असलेला हा कर्नाक पूल 2022 मध्ये पाडण्यात आला होता. त्यानंतर BMC कडून मध्ये रेल्वेच्या आराखड्यानुसार हा पूल परत नव्याने बांधण्यात आला आहे.

हा पूल तयार झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते.

हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दरम्यान दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shahapur : शहापूरमधील R.S दमानिया स्कूल प्रकरण; फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल