Singer Anjali Bharti On Amruta Fadnavis : कवालीकार अंजली भारती यांनी भंडाऱ्याच्या फुलमोगरा येथे 14 जानेवारीला झालेल्या भीम मेळावा दरम्यान केलेले हे वादग्रस्त वक्तव्य आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेली ही टिप्पणी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली असून त्यावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं काय म्हणाली अंजली भारती?
एका सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या कसं सरकार फाशी देईल हे मोदी सरकार फाशी देईल का मी तर म्हणतो त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार करण्यापेक्षा या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्याची बायको माल बनवून फिरते त्याच्या बायकोवर बलात्कार करावा
या प्रकाराचा तीव्र निषेध करत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिलांबद्दल अशा भाषेचा वापर होणं निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक पातळीवर जाणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी संबंधित गायिका आणि कार्यक्रम आयोजकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक व्यासपीठावरून अशा प्रकारचं बोलणं समाजासाठी घातक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आता पुढील कायदेशीर पावलं काय उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात
एका सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने आक्षेपार्ह विधान केले.
या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल ही टिप्पणी करण्यात आली.
संबंधित विधान सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे.
या प्रकरणावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.