ताज्या बातम्या

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या बाजूने मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळवण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचणार आहे.

मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झि वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...