Kawad Yatra 
ताज्या बातम्या

Kawad Yatra : कावड यात्रेदरम्यान रस्ते अपघातांत 6 कावडियांचा मृत्यू, 20 जण जखमी

कावड यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात रविवारी एकाच दिवशी घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांनी सहा कावडियांचा मृत्यू झाला आहे तर 20 भाविक जखमी झाले.

Published by : Team Lokshahi

(Kawad Yatra)कावड यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात रविवारी एकाच दिवशी घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांनी सहा कावडियांचा मृत्यू झाला आहे तर 20 भाविक जखमी झाले. दिल्ली-डेहराडून महामार्ग आणि गंगा कालवा मार्ग या प्रमुख रस्त्यांवर कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीचा परिणाम म्हणून रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटनांनी खळबळ उडवून दिली.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात दिल्ली हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन अपघातांनी दोन कावडियांचे बळी घेतले तर यामध्ये आठ जण जखमी झाले. पहिला अपघात बारला पुलाजवळ घडला. जिथे दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या आणि त्यात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तो कैरानाहून हरिद्वारच्या दिशेने निघाला होता. दुसऱ्या घटनेत सलीमपूर बाह्यवळण मार्गावर दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने अजून एका कावडियाचा मृत्यू झाला.

त्यानंतर गाझियाबादमध्ये शनिवारी रात्री 11.45 वा. एक भीषण अपघात घडला. दिल्ली-मेरठ महामार्गावर कद्रब्राजवळ एक रुग्णवाहिका भरधाव वेगात येत दोन दुचाकींवर आदळली. या दुर्घटनेत तीन कावडियांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाविक जखमी झाला आहे. माहितीप्रमाणे, ही रुग्णवाहिका मेरठ येथील रुग्णालयात रुग्णाला सोडून परतत होती. दरम्यान, हरिद्वारच्या दिशेने चाललेला चार कावडियांचा मृत्यू झाला. प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा