Jalgaon Accident  Jalgaon Accident
ताज्या बातम्या

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात, गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. कारने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिल्यानंतर गाडीला आग लागली

Published by : Riddhi Vanne

जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. कारने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिल्यानंतर गाडीला आग लागली, आणि दरवाजे लॉक झाल्याने महिला कारमध्येच अडकली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेचा तपशील:

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव जान्हवी मोरे असून त्या आपल्या पती संग्राम मोरे यांच्यासह प्रवास करत होत्या. महामार्गावर पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असताना चालक संग्राम घाबरले, कारण त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. पोलिसांना टाळण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर आदळले.

धडकेनंतर गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. पोलिस व नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काच फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढले मात्र आत अजून एक व्यक्ती अडकल्याचं लक्षात आलं नाही. काही क्षणांतच गाडीने पेट घेतला आणि आत अडकलेल्या जान्हवी मोरे यांचा जागीच मृत्यू झाला

गाडी लॉक झाल्यास काय करावे?

अशा प्रसंगी वाहनातील व्यक्तींनी त्वरित काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास समोरील किंवा मागील काच टोकदार वस्तूने किंवा जॅकने फोडावी कारण या मार्गाने सुटणे सोपे असते. तसेच वाहनात इमर्जन्सी हॅमर ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा अपघातात जीव वाचवता येईल. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप असून वाहन सुरक्षा आणि प्रशिक्षणाबाबत जनजागृतीची मागणी केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा