ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; चंद्रकांत पाटील म्हणाले...

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये 45 वर्षीय बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केला आहे.

अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता अशी माहिती मिळत आहे.

बस चालक सहा वर्षीय चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर आता पुण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी बस चालकाने आणखी काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल. त्याच्यामुळे अधिकाधिक कडक कारवाई करण्याचा शासन विचार करतोय. ही भयंकर विकृती आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात