ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये 45 वर्षीय बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता अशी माहिती मिळत आहे.

बस चालक सहा वर्षीय चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर आता पुण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी बस चालकाने आणखी काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरनं मुलींना चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या ठिकाणी टच केलेलं आहे.

एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफआयआर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्याने अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या ठिकाणी टच केलेलं आहे हे लक्षात आले आणि म्हणून त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. कडक कारवाई करण्यात येत आहे. संस्थाचालकांना देखील बोलवलं आहे. त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का? हे देखील तपासण्यात येईल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात