ताज्या बातम्या

Monsoon News : स्कायमेटचा मान्सूनबाबत अंदाज, महाराष्ट्रात किती पाऊस होणार?

ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.

Published by : Shamal Sawant

हवामान अंदाज संस्था स्कायमेटनं मान्सून 2025 साठीचा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते.

स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते, एलनिनो या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.

हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळं मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. एलनिनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्यानं चांगला पाऊस येऊ शकतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.

जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल. तसेच जुलै महिन्यात 1023 टक्के पाऊस होईल तर 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108 टक्के पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा