'Smart Sunbai' : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित  'Smart Sunbai' : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित
ताज्या बातम्या

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

शहरी आणि ग्रामीण लुकमध्ये कलाकारांची धमाल, 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबरला प्रदर्शित

Published by : Riddhi Vanne

नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेने सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित हास्य, थरार आणि गूढतेने भरलेला एक नवाकोरा सिनेमा “स्मार्ट सुनबाई” 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरवरूनच हे स्पष्ट होते की या कथेत काहीतरी विलक्षण आणि गूढ दडलेले आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर पोस्टर वरील काही कलाकार शहरी लुक मध्ये तर काही कलाकार ग्रामीण लुक मध्ये दिसत आहेत. याच वैविध्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण?आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?” रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार असून, त्यांची केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी जमेची बाजू ठरणार आहे , प्रत्येक सुनेला "स्मार्ट सुनबाई" होण्या साठी हा चित्रपट नक्कीचं प्रेरणादायी ठरेल अस दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले.

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे,साई - पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित चित्रपट ”स्मार्ट सुनबाई” 21 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा