Smriti Mandhana palash muchhal Wedding Smriti Mandhana palash muchhal Wedding
ताज्या बातम्या

Smriti Mandhana palash muchhal Wedding : स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर आता मोठा धक्का, पती पलाश मुच्छल हॉस्टिपलमध्ये केले दाखल

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या आधीच एक मोठा धक्का समोर आला आहे. रविवारी दुपारी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Published by : Riddhi Vanne

(Smriti Mandhana palash muchhal Wedding) स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या आधीच एक मोठा धक्का समोर आला आहे. रविवारी दुपारी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असून, आता त्यांची तब्येत स्थिर आहे. यानंतर, संध्याकाळी स्मृतीच्या होणाऱ्या पती पलाश मुच्छल यांचीही तब्येत बिघडली. सुरुवातीला घरीच उपचार करण्यात आले, पण नंतर त्यांना सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन, त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडून देण्यात आले आहे.

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. त्यांचे मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम मोठ्या धूमधामात झाले होते, आणि त्यात भारताच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूही उपस्थित होते. पण लग्नाच्या दिवशी दोन वेळा प्रकृती बिघडल्याने दोघांनाही मोठा धक्का बसला. स्मृतीसाठी हा दिवस तणावाचा ठरला, कारण वडिलांची तब्येत आणि पतीची अस्वस्थता यामुळे तिच्या लग्नाच्या तयारीत अडचणी आल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा