रविवारी सांगलीत भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. काल रात्री तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. यानंतर आज दुपारी तिचा लग्नसोहळा संपन्न होणार होता. परंतु, या लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मृती मानधना हिच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अचानक अॅम्ब्युलन्स आली अन् खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती अचानक खालावली, ज्यामुळे पाहुणे आणि कुटुंबीयांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिका विवाहस्थळी बोलावण्यात आली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर विवाहस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र अधिकृतरीत्या नेमका वैद्यकीय अहवाल किंवा पुढील प्रकृतीविषयी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विवाह
सांगली येथील स्मृतीच्या फार्म हाऊसवर अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये दाखल झाल्या आहेत. आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता सुरू होईल. या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील अशी माहिती पोलिसांच्या कडून देण्यात आली आहे. तर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या उपस्थितीबद्दल मात्र शंका उपस्थित केली जातेय. ज्या ठिकाणी स्मृती मानधनाचा विवाह सोहळा संपन्न होणार होता.