ताज्या बातम्या

Pune symbiosis college : सिम्बॉयसिसच्या कार्यक्रमात फडणवीसांच्या मंचासमोर आढळला साप

पिंपरी चिंचवडजवळील किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये (Pune symbiosis college)आज सहावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

पिंपरी चिंचवडजवळील किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये (Pune symbiosis college)आज सहावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. त्यासोबतच स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा उद्घाटन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. मात्र या महत्त्वपूर्ण सोहळ्यापूर्वी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील मंचाखाली एक विषारी साप आढळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या मुख्य मंचावर उपस्थित राहणार होते, त्याच मंचाखाली एक साप आढळून आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP) मंचावर येण्यापूर्वी सापाचा शिरकाव झाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. सध्या या सापाला शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर होते. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करत यंत्रणांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ सिम्बॉयसिस विद्यापीठात दाखल झाल्यानंतर प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाकडून मिसाळ यांना गेटवर स्वागत करण्यासाठी कोणीही आले नाही. यामुळे राज्यमंत्री माधुरी मिसाळ चांगल्याच संतापल्या. राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बॉयसिस प्रशासनाने अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती होती.

तर दुसरीकडे दीक्षांत समारंभासाठी आलेल्या पालकांनी ऑडिटोरियमच्या बाहेर मोठा गोंधळ घातला. मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या या सोहळ्यात पालकांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना कार्यक्रमाबाबत योग्य त्या सूचना वेळेत मिळाल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पालक वर्गाने नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा