Pune Crime : पुणे हादरलं! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने संपवलं जीवन; पुण्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती Pune Crime : पुणे हादरलं! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने संपवलं जीवन; पुण्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
ताज्या बातम्या

Pune Crime : पुणे हादरलं! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने संपवलं जीवन; पुण्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

Pune Crime : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने संपवलं जीवन, हुंडाबळीची पुनरावृत्ती.

Published by : Riddhi Vanne

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या ताजे असताना पुन्हा एकदा हुंडाबळीची घटना घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आंबेगावमधील स्नेहा सावंत- झेंडगेने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. घडलेली घटना आत्महत्या नसून तिची नियोजित कटातून हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या माहेरच्यांनी केला आहे.सदर प्रकरणामुळे परिसरात एक खळबळ उडाली असून समाजातील हुंडाप्रथा किती खोलवर रुजली असल्याचे पुन्हा नवीन उदाहरण पाहायला मिळाले आहे. आरोपीला अटक करावी तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.पैशाच्या लोभापायी मुलींचा जीव घेणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊ,असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना व्यवसायात तोटा होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!

Actor Kishor Kadam :कवी सौमित्रच्या घरावर संकट; मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव घेतली